
नवरात्रोत्सव २०२६ | नवदुर्गा, नऊ रंग आणि नऊ सामाजिक उपक्रम! नवरात्रोत्सवातील नऊ रंगांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची अनोखी परंपरा उन्नती सोशल फाउंडेशनने यंदाही जपली आहे. याच सेवाभावी परंपरेचा एक भाग म्हणून, आज नवरात्रोत्सवाच्या लाल रंगाचे औचित्य साधत संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला. तसेच, अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. लायन्स क्लबच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान, रक्तदानातून वाचू शकते एखाद्याचे प्राण!
पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नतीच्या गणरायाची काल गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी डॉक्टर व महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते मनोभावे आरती करण्यात आली. आरोग्यसेवेत निःस्वार्थ भावनेने कार्यरत राहून रुग्णांना उपचार, आधार आणि नवजीवन देणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा आरतीचा मान देण्यात आला. समाजाच्या आरोग्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडणाऱ्या आरोग्यसेवकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर त्यांच्या सेवाभावाचा आणि समर्पणाचा गौरव आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने गणरायाच्या आरतीचा मान समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या घटकांना देण्याची परंपरा जपली जाते. गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचा सन्मान करणारा उत्सव व्हावा, हीच या उपक्रमामागील भावना आहे. ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशनच्या ‘उन्नतीच्या गणपती’च्या गणेशोत्सवात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पावन पर्वात पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांच्या शुभहस्ते उन्नतीच्या गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष प्रसंग ठरला. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती व घटकांना गणरायाच्या आरतीचा मान दिला जातो. यापूर्वी सफाई कामगार, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, तृतीयपंथी बांधव यांच्यासह विविध घटकांना हा सन्मान देण्यात आला आहे. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “उन्नतीचा गणपती हा केवळ उन्नती सोशल फाऊंडेशनचा गणपती नसून पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या श्रद्धेचा आणि आपुलकीचा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान व्हावा, ही आमची भूमिका आहे.” सामाजिक एकोपा, परस्पर सन्मान आणि ‘सर्वांच्या सहभागातून समाजाची उन्नती’ हा संदेश देण्याचा उन्नती सोशल फाऊंडेशनचा सातत्याने प्रयत्न आहे. याचबरोबर श्री गणेश महापूजा व महाप्रसाद तसेच विविध सोसायट्यांमधील ढोल-ताशा व लेझीम पथकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. भक्तीला सामाजिक जाणिवेची जोड… परंपरेला कृतज्ञतेची साथ… आणि उत्सवाला सर्वसमावेशकतेची दिशा… हीच ‘उन्नतीच्या गणपती’ची विशेष ओळख! यावेळी डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक श्री. संजय भिसे यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सदस्य, उन्नती सखी मंचच्या सदस्या, ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य, विठाई वाचनालयाचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य तसेच पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षक उपस्थित होते. गणरायाच्या चरणी प्रार्थना — सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो! ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
Unnati Social Foundation - मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम -भाविकांच्या प्रतिक्रिया
Unnati Social Foundation - मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम
Adv. Geetanjali Kadate: उन्नती सोशल फाउंडेशनच्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेण्यासाठी त्या आल्या असताना त्यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे आणि समाजासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. गरजूंसाठी सातत्याने काम करण्याची संस्थेची भूमिका आणि विविध उपक्रमांमधून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. उन्नती सोशल फाउंडेशनच्या या कार्याचे विशेष कौतुक करत, भविष्यातही अशाच उत्साहाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांनी संस्थेला शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मोफत अॅक्युप्रेशर थेरपी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. ६ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित या शिबिरात आतापर्यंत सुमारे २७८ नागरिकांनी सहभाग घेत थेरपीचा लाभ घेतला. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, टाचदुखी, घोटेदुखी तसेच स्नायू व सांधेदुखी यांसारख्या विविध शारीरिक त्रासांबाबत मार्गदर्शन आणि FREE DEMOच्या माध्यमातून थेरपीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. यासोबतच शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा आणि ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या नागरिकांचा सामूहिक वाढदिवस सोहळाही उत्साहात पार पडला. आरोग्य आणि आनंदासोबत समाजातील विविध घटकांचा सन्मान करण्याचा हा सेवाभावी प्रवास असाच सुरू राहणार!
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बहिण-भावाच्या नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत प्रेम, आपुलकी आणि विश्वबंधुत्वाचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी संस्थापक श्री. संजय आबा भिसे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी पिके इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ आप्पा काटे, आनंद हास्य क्लबचे पदाधिकारी व सदस्य, विविध सिटीझन ग्रुपचे सभासद आणि उपस्थित नागरिकांना राखी बांधून बंधुत्वाचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘विश्वबंधुत्वा’च्या विचारांना कृतीतून जपत, समाजातील नात्यांमध्ये प्रेम, स्नेह आणि परस्पर आदर अधिक दृढ करण्याचा हा छोटासा पण सुंदर प्रयत्न ठरला. या प्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, आनंद हास्य क्लब, सीनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य तसेच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनिक क्षणही आहे. याच भावनेतून सालाबादप्रमाणे यंदाही उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने औंध मिलिटरी स्टेशन येथे संरक्षण दलातील अधिकारी व जवानांसोबत रक्षाबंधनाचा अनोखा आणि भावस्पर्शी उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. उन्नती सखी मंचच्या महिला सदस्यांनी जवानांच्या मनगटावर प्रेम, स्नेह आणि आपुलकीची राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा हा उपक्रम यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे , सुभेदार नवीन कुमार साहेब, निवृत्त सुभेदार मेजर संतोष पुरण वानखडे, सुभेदार मोहम्मद असद इकबाल, सुभेदार मेजर विनोद चव्हाण, हवालदार महेश प्रताप पात्र, हवालदार राजकुमार तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधन म्हणजे केवळ मनगटावर बांधला जाणारा धागा नाही, तर भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाची, काळजीची आणि आशीर्वादाची आठवण बांधणारा हळुवार क्षण…! मात्र काही भावांच्या बहिणी लांब असतात, काहींना परिस्थितीमुळे रक्षाबंधन साजरं करणं शक्य होत नाही. अशा प्रत्येक भावाच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाची उणीव भासू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून पिंपळे सौदागरमध्ये हा अनोखा उपक्रम जपला जात आहे. घरोघरी राखी पोहोचवताना केवळ राखी दिली जात नाही… तर दिला जातो एक प्रेमाचा धागा, एक आपुलकीचा स्पर्श आणि बहिण-भावाच्या नात्याचा हळुवार अनुबंध. कारण काही नाती रक्ताची असतात… आणि काही नाती मनाने जोडलेली असतात.!
उन्नती सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून रोझ आयकॉन सोसायटीमध्ये सेंद्रिय कचरा कंपोस्टिंग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत सोसायटीला ६ कंपोस्टर बॉक्स विनामोबदला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. घरातून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे जागेवरच कंपोस्टिंग करून त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशन आणि स्वर्णलता मदरसन यांच्या CSR अंतर्गत SORT (Segregation Of Waste for Recycling and Treatment) प्रकल्पाच्या माध्यमातून हे कंपोस्टिंग तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांसाठी कचरा वर्गीकरण व योग्य व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात आली. भाजीपाल्याच्या व फळांच्या साली, उरलेले अन्न, चहापत्ती, पाने-फुले यांसारख्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा उपयोग सोसायटीच्या उद्यानातील झाडे व हिरवळीच्या देखभालीसाठी करता येणार आहे. कचरा कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि त्याचे संसाधनात रूपांतर करणे हीच या उपक्रमाची व्यापक संकल्पना आहे. रोझ आयकॉन सोसायटीपासून सुरू झालेली ही पर्यावरणपूरक चळवळ पिंपळे सौदागरमधील अधिकाधिक सोसायट्यांपर्यंत पोहोचविण्याचा उन्नती सोशल फाउंडेशनचा संकल्प आहे. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे, रोझ आयकॉन सोसायटीचे चेअरमन श्री. रवी मुंडे, सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी व नागरिक उपस्थित होते.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘उन्नती सखी – हरियाली तीज उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. हरियाली तीजच्या निमित्ताने उन्नती सखींनी एकत्र येत नृत्य, खेळ, रील्स, गप्पा-मस्ती आणि स्वादिष्ट भोजनाचा मनमुराद आनंद घेतला. हिरवाईच्या रंगात सजलेल्या या उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले समूह नृत्य सादरीकरण, ज्यामध्ये प्रत्येकी जास्तीत जास्त ८ महिलांच्या समूहांनी उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक हिरवी साडी किंवा हिरवा सूट आणि हिरव्या बांगड्या असा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत एकमेकींसोबत आनंदाचे क्षण साजरे केले आणि तीज उत्सवाच्या परंपरेला आधुनिक आनंदाची सुंदर जोड दिली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या ‘उन्नती सखी’ उपक्रमातून महिलांसाठी आनंद, मैत्री, स्नेह आणि एकत्रित उत्सवाचे सुंदर व्यासपीठ निर्माण करण्याचा हा एक आनंददायी प्रयत्न ठरला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे ‘तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२६’ उत्साहात पार पडली. शेकडो सायकलप्रेमींनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. राष्ट्रप्रेमासोबतच निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या रॅलीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उन्नती सोशल फाऊंडेशन, गोविंद ग्रुप, इंडो ॲथलेटिक सोसायटी आणि चॅलेंजर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कारगील विजय दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशन, यशसिद्धी, आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन आणि माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कारगील युद्धातील वीर पत्नी मंगला साळुंके, जयश्री धनवडे, पद्मिनी भालेराव, नैना सकट आणि प्रतिमा भाटे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श प्रत्येकाने जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. नगरसेविका डॉ. कुंदा भिसे यांनी शहीदांचे बलिदान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, नाटिका आणि सांस्कृतिक सादरीकरणातून शहीदांना मानवंदना दिली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कारगील विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.
आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे! 'उन्नती सोशल फाउंडेशन' आणि 'यशसिद्धी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कारगिल विजय दिवस २०२६ निमित्त शहीद जवान श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होत देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर वीरांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी वीर परिवारांचा आणि आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी कार्याला कृतज्ञतापूर्वक सलाम! शहीद अमर आहेत... त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील! जय हिंद! वंदे मातरम्!
'उन्नती सोशल फाउंडेशन' आणि 'यशसिद्धी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कारगिल विजय दिवस २०२६ – शहीद जवान श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होत अमर शहीद जवानांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. या प्रसंगी वीर परिवारांचा आणि आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कारगिलमधील शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी आहे. जय हिंद! वंदे मातरम्!
पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी वाहतूक विभागातील पोलिसांना रिफ्लेक्टरयुक्त रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पावसात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांची सुरक्षितता वाढावी, रात्रीच्या वेळी त्यांची दृश्यमानता अधिक चांगली व्हावी आणि त्यांना कर्तव्य बजावताना आवश्यक संरक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. याप्रसंगी सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पोलीस उपनिरीक्षक दगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालव, पोलीस हवालदार मुंडे, पोलीस शिपाई साबळे आणि महिला पोलीस शिपाई गुजर उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक श्री. संजय भिसे यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पवना नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळील शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे मदत उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना ब्लँकेट, बिस्किटे व साड्यांचे वाटप करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले. संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच उन्नती सोशल फाउंडेशनची कार्यसंस्कृती असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सामूहिक वाढदिवस सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या आनंदोत्सवात पुस्तक प्रकाशन, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला. समाजाला जोडणारे, प्रेरणा देणारे आणि प्रत्येक आनंदाचा उत्सव साजरा करणारे असे उपक्रम यापुढेही अविरत सुरू राहतील.
डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या पुढाकारातून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या NCMC कार्ड वितरण उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ९५६ नागरिकांना NCMC कार्डांचे वितरण करण्यात आले. "वन नेशन, वन कार्ड" या संकल्पनेवर आधारित NCMC कार्डमुळे मेट्रो, बस, पार्किंग, टोल तसेच विविध डिजिटल व्यवहार एकाच कार्डद्वारे सुलभपणे करता येणार आहेत. नागरिकांना आधुनिक व कॅशलेस व्यवहार प्रणालीशी जोडण्याचा हा उपक्रम ठरला. यावेळी ह.भ.प. विजयशेठ जगताप, जयनाथ काटे, भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिताताई काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे उपस्थित होते.
उन्नती सोशल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आयोजित मोफत लसीकरण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना आवश्यक लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच गर्भवती महिलांना पीएमएमव्हीवाय (PMMVY) योजनेबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. मोठ्या संख्येने पालकांनी व नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवून आपल्या पाल्यांच्या निरोगी भविष्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाला लाभार्थी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित सर्व नागरिक, पालक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
उन्नती सखी मंच आणि उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅपशक्ती – आपल्या व्यवसायासाठी स्वतःचे अॅप” या नाविन्यपूर्ण अॅपचे उद्घाटन डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे (अध्यक्षा, उन्नती सखी मंच) यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महिला उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सहजपणे उभारता यावा, वाढवता यावा आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे अॅप केवळ काही मिनिटांत सुरू होते. या अॅपद्वारे संदेश सेवा माध्यमातून ऑर्डर घेणे, वेळ निश्चिती नोंदणी, तत्काळ सूचना, एकात्मिक देयक पद्धतीद्वारे पैसे स्वीकारणे, शोधयंत्रावर व्यवसाय दिसणे, तसेच विविध भाषांमध्ये सुविधा अशा अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे उन्नती सखी सदस्यांसाठी सुरुवातीचे तीन महिने पूर्णतः विनामूल्य असून त्यानंतर सवलतीच्या दरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. “उन्नती सखी – नवे जोश, प्रगतीच्या दिशेने…” या ध्येयवाक्याला साकार करत महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे.
दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण ठरलेला तृतीय वर्षाचा सामुदायिक विवाह सोहळा पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिव्यांग जोडप्यांनी सन्मानाने नवजीवनाची सुरुवात केली. या प्रसंगी संस्थेच्या सेवाभावी कार्यासाठी फोर व्हीलर वाहनाचे लोकार्पणही करण्यात आले.
ग्रीनलँड सोसायटी, पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने डस्टबिन व ईव्ही चार्जिंग पॉइंटचा शुभारंभ.
रविवारी पहाटे पुणे शहरात एक आगळीवेगळी सामाजिक चळवळ अनुभवायला मिळाली, जेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशन , इस्कॉन बीसीईसी, विशाल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रन टू फीड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. इस्कॉनच्या फूड फॉर लाईफ उपक्रमाअंतर्गत ही मॅरेथॉन भुकेच्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर - ११ मार्च २०२५, उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय , पिंपळे सौदागर, चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
उन्नती सोशल फाउंडेशन व सिद्ध आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मधील सर्व मुलांसाठी - स्वर्ण बिंदू प्राशन संस्कार (सुवर्ण प्राशन ), वयोगट 0 ते 16 वर्षांपर्यंत, पुष्य नक्षत्र 16 एप्रिल 2024 रोजी , वेळ - सकाळी १०:०० ते ५:०० वाजेपर्यंत, उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे 200 रुपयाचा डोस 50 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उन्नती सोशल फाउंडेशन येथे जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी , संत तुकाराम गाथा यांचे विधिवत पूजन करून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक दिनावर आधारित पुस्तकांचे वाटप याप्रसंगी नागरिकांना करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी , संस्थापक संजय भिसे भूषण वायकर , मनोज शेजळ , मोहन राम , संतोष कोळवणे , अनिल कापसे , महेश गवस , संजय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्किंग वूमनसाठी एकप्रकारे देवदूत असणाऱ्या , कष्टकरी महिला आणि वर्किंग वूमन यांच्या भावबंधावर आधारित , "नाच ग घुमा" या चित्रपटाच्या प्रोमोशन साठी चित्रपटाचे कलाकार वृंद , दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासह अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, नम्रता संभेराव , शर्मिष्ठा राऊत तर , अभिनेते सारंग साठे , आणि प्रथमच निर्माता म्हणून पदार्पण करत असलेले स्वप्नील जोशी यांनी लोकमत पिंपरी विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन डॉ. कुंदाताई भिसे आणि संस्थापक श्री. संजय भिसे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ,ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा करणाऱ्या स्वदेशी वाणाच्या , वड , पिंपळ , चिंच , कडुलिंब , औदुंबर , सुबाभळ या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच , या या रोपण केलेल्या वृक्षांची निगा देखील उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राखण्यात येणार आहे. याप्रसंगी , संस्थापक संजय भिसे , अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे , रमेश वाणी , बाळकृष्ण चौधरी , दिलीप चौगुले यांच्यासह विठाई वाचनालयाचे सदस्य , आनंद हास्य क्लबचे सदस्य आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.होमीभाभा फाऊंडेशन , मुंबई यांच्यातर्फे इ.५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना त्यांचे इंग्रजी आणि गणित या विषयातील कौशल्य वाढविण्यासाठी - (ग्रेट) सामान्य इंग्रजी चाचणी, (MSAT) गणित विज्ञान अभियोग्यता चाचणी. उन्नती सोशल फाऊंडेशन आणि डॉ.होमीभाभा फाऊंडेशन , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील पी.के.इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या नावनोंदणी शुल्कात रु.१०० रुपयांची शैक्षणिक फी सवलत देण्यात येत आहे.
नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान
आवश्यक कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा (कोणतेही एक) - आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन
रहिवासी पुरावा (कोणतेही एक) - आधार कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक, गॅस पावती बुक, ड्रायव्हिंग लायसन, भारतीय पासपोर्ट
एक पासपोर्ट साईज फोटो
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने , दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कला शिक्षक सुधीर लांडगे आणि भगवान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर मधील २५० हुन अधिक मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. सुप्रसिद्ध सिने अभिनेते दे धक्का फेम संजयजी खापरे यांची उपस्थिती या कार्यशाळेचे आकर्षण ठरली. संजयजी खापरे यांनी मुलांशी संवाद साधत , त्यांना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले.
उन्न'ती' चा गणपती महोत्सव - २०२४ अंतर्गत गणरायाच्या आरतीचा मान समाजातील दुर्लक्षित घटकांना प्राध्यानाने दिला जातो. याच अंतर्गत , गणरायाची आरती पिंपळे सौदागर मधील कर्तव्यावर असणाऱ्या सफाई महिला कामगार भगिनींच्या शुभहस्ते करण्यात आली.
उन्नती सोशल फाऊंडेशन , वेंसर हॉस्पिटल आणि ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिख धर्माचे संस्थापक , आद्य गुरू आणि मानवतावादी शिकवण देणारे संत गुरुनानक भगवान यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात उंची , वजन , ब्लड प्रेशर , ECG हृदयाचा आलेख , ब्लड शुगर , हाडांची घनता , नेत्ररोगतज्ञ यांच्या मार्फत नेत्रदोष तपासणी विनामूल्य करण्यात आली. तसेच , एक्स रे मध्ये ३० % सूट , पॅथॉलॉजी लॅब टेस्ट मध्ये २०% सूट , डेक्सा स्कॅन मध्ये २० % सूट देण्यात आली. पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. वेंसर हॉस्पिटल तर्फे डॉ.समीर पाटील (ऑर्थोपेडिक) , डॉ शरून शितोळे , डॉ.शैलेश तारू (व्यवस्थापक ), नितीन पंडित (व्यवस्थापक) या वैद्यकीय टीमने या शिबिरात सहभाग घेतला.
उन्न'ती' चा गणपती महोत्सव - २०२४ अंतर्गत इको फ्रेंडली गणेशा मोफत कार्यशाळा संपन्न
पीसीईटी इन्फिनिटी 90.4 या कम्युनिटी रेडिओ चॅनेलने शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना प्रसिद्धी प्रदान करण्यासाठी "आधी केलेची पाहिजे " हे सदर सुरू आहे. PCET Infinity 90.4 FM रेडिओ I उन्नती सोशल फाउंडेशनने आजवर केलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा
रोझलँड सोसायटी , पिंपळे सौदागर यांच्या वतीने दीपावली निमित्त सायकल डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. चंदन चौरसिया आणि धवल प्रजापती यांनी ज्येष्ठ नागरिक विजय मुळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या माध्यमातून डोनेट करण्यात आल्या. या जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीचा खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशनने हातभार लावला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशन आणि सप्तर्षी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर मधील दिव्यांग बालकांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्र अभियान उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय येथे राबविण्यात आले. पूर्व नावनोंदणीने पिंपळे सौदागर येथील १०० दिव्यांग बालकांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग ओळखपत्र याद्वारे प्राप्त केले.
उन्नती सोशल फाउंडेशन व नंददीप आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर. शिबिरामध्ये खालील प्रमाणे तपासणी: रेटिना तपासणी, काचबिंदू तपासणी (IOP), मोतीबिंदू तपासणी, अंतिम स्पेक्ट पॉवर. डॉक्टरांचा सल्ला- समुपदेशन. ऑपरेशनची गरज असल्यास ऑपरेशनमध्ये उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे १० % सवलत देण्यात येईल.
सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी पिंपळे सौदागर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सन २०२५ चे स्वागत २०२५ रोप वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच , भारतीय स्त्री शिक्षणाचा अधिकार जागृत करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ०१ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या वर्धापनदिनाचे औचित्य देखील या रोप वाटपाला होते.
पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटी यांच्या वतीने सायकल डोनेशन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. आज गरजू मुलांना या सायकलींचे वाटप करण्यात आले. चंदन चौरसिया आणि धवल प्रजापती यांनी ज्येष्ठ नागरिक विजय मुळकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या माध्यमातून डोनेट करण्यात आल्या. या संपूर्ण जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीचा खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशनने हातभार लावला आहे.
5 लाखापर्यंत मोफत उपचार. 70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर. नाव नोंदणी व स्मार्ट कार्ड वाटप शिबिर
स्थळ :- उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय पी.के इंटरनॅशनल स्कूल समोर , पिंपळे सौदागर.
दिव्यांग बालकांना मोफत औषधोपचार दिले. आजपर्यंत शेकडो दिव्यांग मुलांना व बालकांना मोफत औषध उपचार केले. झुंज दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून संस्थेने २०२४ ला दिव्यांग बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे देखील आयोजन केले होते. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून १ डिसेंबर रोजी उन्नती फाउंडेशनने दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी म्हणजेच वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व प्रमाणपत्र यासंदर्भात शिबीर घेतले.
एकच लक्ष १०,००० वृक्ष उपक्रम गेली ६ वर्षपासुन राबवण्यात येत असून दरवर्षी नववर्षा स्वागत करत मोफत वृक्ष वाटप करण्यात येते. नववर्षाचे स्वागत वृक्षसंवर्धनाने करावे ही यामागील फाऊंडेशनची पर्यावरणपूरक भूमिका आहे. नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताला एक नवीन झाड लावावे आणि त्याचे संवर्धन करावे असा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
दर वर्षी विविध दिनानिमित्त वर्षातून बऱ्याच वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते रक्तदान हे सर्वोत्तम दान समजले जाते. त्यामुळे दर वर्षी विविध औचित्याने, फाऊंडेशनचा रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा मानस असतो. पिंपरी चिंचवड शहरातील विविध रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत उन्नती सोशल फाउंडेशन विविध रक्तदान शिबिरे आयोजित करते.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी मोफत वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. नागरिकांची वैचारिक वृद्धी व्हावी यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे विठाई वाचनालयाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात असून, २००० हून अधिक पुस्तकांचा वाचनालयात संग्रह आहे. नागरिकांकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचा स्वीकार देखील विठाई वाचनालयात करण्यात येतो. विठाई वाचनालय हे एकप्रकारे लोकचळवळ ठरत आहे.
पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरु आहे. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी फाऊंडेशन मार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असून, गरजवंत रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती मध्ये, उन्नती सोशल फाऊंडेशनची रूग्णवाहिका सज्ज असते.
पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत वैकुंठरथ सेवा सुरु आहे. आपल्या प्रियजणांना भावपूर्ण आणि सन्मान जनक निरोप देण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे, वैकुंठरथाची निर्मिती करण्यात आली असून, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची वैकुंठगमन मूर्ती त्यावर अंकित आहे.
पिंपळे सौदागर मध्ये गेल्या ५ वर्षांपासून मोफत पाणपोई सुविधा उपलब्ध करून आता पर्यंत १० पाणपोई सुरु आहेत. पिंपळे सौदागर येथे विविध १० ठिकाणी मोफत पाणपोई सुविधा फाऊंडेशन मार्फत उभारण्यात आली असून, या पाणपोई द्वारे शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले, आर.ओ. आणि सुमधुर थंड पिण्याचे पाणी गेल्या ५ वर्षांपासून नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
मोफत आधार स्मार्ट कार्ड व मतदार स्मार्ट कार्ड उन्नती सोशल फाउंडेशन मधून काढून देण्यात येते. नागरिकांच्या सोयीसाठी एक अंत्यत महत्वाचे डॉक्युमेंट असलेल्या आधार कार्ड व मतदार स्मार्ट कार्ड उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे मोफत काढून देण्यात येते. आजवर नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे दर वर्षी सामूहिक विवाह पार पाडण्यात येतो. गोरगरीब कुटुंबांसाठी विवाह ही तशी खर्चिक बाब! मात्र, उन्नती सोशल फाउंडेशन हीच बाब ध्यानात घेऊन दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा पार पाडते.
दर वर्षी उन्न "ती" चा गणपती महोत्सव साजरा करण्यात येतो त्यामध्ये ऐच्छिक दान पद्धतीने नागरिकांसाठी गणेश मुर्त्या उपलब्ध केल्या जातात व आरतीचा मान हा तृतीयपंथी,विधवा, अंध, सफाईकामगार महिला इत्यादी महिलाना दिला जातो.
पिंपळे सौदागर मध्ये सोसायटी व कॉलनी मध्ये जवळजवळ न १२५ मोफत सौर दिवे (सोलर पोल) फाउंडेशन तर्फे बसून देण्यात आले. अपारंपरिक आणि सौरऊर्जा चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत १२५ मोफत सौर दिवे बसविण्यात आले आहेत.
पाण्याची समस्या दूर करण्यासाठी , पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरामधील मधील सोसायट्यांमध्ये टँकर मुक्त सोसायट्या व्हाव्या त्यासाठी फाउंडेशन तर्फे आतापर्यंत ८० बोरवेल देण्यात आल्या.
पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी दरवर्षी स्वरामृत दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आजवर हिंदी-मराठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमात सादर केली आहे.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी मोफत फाउंडेशन तर्फे बसण्यासाठी बेंचेस देण्यात येतात. आज या बेंचेंसचा उपयोग अनेक रहिवासी सोसायटी मधील नागरिक विरुंगुळा तसेच गप्पा-गोष्टी करण्यासाठी करत आहेत.
पिंपळे सौदागर मधील नागरिकांसाठी दरवर्षी सहलीचे आयोजन करण्यात येते. सहल-पर्यटन हा नागरिकांच्या दृष्टीने अंत्यत जिव्हाळ्याचा विषय . हवापालट झाल्याने मन ताजेतवाने राहते. हीच बाब लक्षात घेऊन, दरवर्षी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांची सहल आयोजित केली जाते.
फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. नागरिकांचे आरोग्य हा पैलू देखील उन्नती सोशल फाउंडेशनने अग्रक्रमाने घेतला आहे. नागरिकांसाठी जनरल हेल्थ चेकअप, उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, थायरॉईड तपासणी शिबिर यांसारखी आरोग्य तपासणी शिबिरे फाऊंडेशन मार्फत वर्षभर राबविले जातात.
मोफत सुवर्णप्राशन व बालक वाढविकास तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. सुदृढ. समाज हा सुदृढ बालकांमुळेच निर्माण होतो. त्यामुळे दरवर्षी लहान बालकांसाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे, मोफत सुवर्णप्राशन व बालक वाढविकास तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते.
लहान मुलांच्या कालगुणांना वाव देण्यासाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच दक्ष आहे. शिवजयंती, नवरात्र आणि गणेशोत्सव या निमित्ताने दरवर्षी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
दर वर्षी विविध दिनानिमित्त वर्षातून बऱ्याच वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते रक्तदान हे सर्वोत्तम दान समजले जाते. त्यामुळे दर वर्षी विविध औचित्याने, फाऊंडेशनचा रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा मानस असतो. पिंपरी चिंचवड शहरातील विविध रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत उन्नती सोशल फाउंडेशन विविध रक्तदान शिबिरे आयोजित करते. शिवविचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी, दरवर्षी लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा आणि शिवचरित्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
लहान मुलांसाठी दरवर्षी गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन पुढाकार घेत असते. दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असते.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन येथे गुणवंत शालेय धावपट्टू प्रथमेश गणेश जाधव यांचा व यांचे पालक आई पल्लवी जाधव आणि वडील गणेश जाधव यांच्यासह सत्कार करण्यात आला.
दर वर्षी तिरंगा सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रा रॅली चे आयोजन करण्यात येते. दरवर्षी स्वातंत्र्यदिना निमित्ताने तिरंगा सन्मान यात्रा फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येते. सायकल राईड द्वारे प्रभातफेरी काढून, राष्ट्रचेतना जागृती करण्यात येते.
नवरात्री मध्ये नऊ रंगाचे महत्व अनुसरून कार्यक्रमांची आखणी करण्यात येते. नवरंगाप्रमाणे नऊ उपक्रम राबविण्यात येतात व भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
दरवर्षी बालदिनानिमित्ताने , बालजात्रेचे आयोजन करण्यात येते. बालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात येतात.
सांप्रदायिक चळवळीसाठी, उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच अग्रेसर आहे. भजन संस्कृतीला पुढे घेऊन जाण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
सर्वच थोर महापुरुषांच्या जयंत्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात. प्रातिनिधीक स्वरुपात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासोबतच व्याखानाद्वारे महापुरुषांचे विचार पोहोचविण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन कटिबद्ध आहे.
उन्नती चषक 2024 बॅनरखाली एका भव्य उत्साहात, कुंदा ताईंच्या वाढदिवसानिमित्त एक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट उन्नती फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. कुंदा ताई भिसे यांनी सुरु केला.
इझी फिजिकल वर्कआउट्स, लाफ्टर योगा आणि प्राणायाम यासारखे उपक्रम रोज सकाळी आयोजित केले जातात.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत व्हीलचेअर, पाण्याची गादी, टॉयलेट सीट, वॉकर भाड्याने दिले जाते.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात जसे बचत गट, मुलींसाठी आरोग्य शिबीर, विमा पॉलिसी, मेहेंदी क्लास, इत्यादी.
उन्नती सोशल फाऊंडेशन मार्फत पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन - तुमच्यातील धावण्याची आवड दाखवण्यासाठी एक प्रारंभिक शर्यत आयोजित करण्यात आली.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चालवण्यात येते.
उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेतील लहान मुला मुलींना खाऊ, चित्रकलेचे साहित्य, व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जरवरी सोसायटी, पी.के. इंटरनॅशनल स्कूल समोर,
पिंपळे सौदागर,
पुणे, महाराष्ट्र, भारत
+91 91460 87777
info@unnatisocialfoundation.org

